Archive for category Farming

शेतकऱ्यांच्या ‘मसिहा’चा गौरव

बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील समौता गावामध्ये एक आगळावेगळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभामध्ये भात उत्पादकांनी फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार आणि “सब-1’जनुकाचे संशोधक डॉ. डेव्हिड मॅकील यांचा सत्कार केला. या सत्काराचे कारण म्हणजे भाताची “स्वर्ण-सब-1′ ही जात या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येणारी ठरली.
बिहारमधील चंपारण या जिल्ह्यात दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका भात शेतीला बसतो, त्यामुळे भात शेतीचे नुकसान हे ठरलेले; परंतु या भागातील शेतकऱ्यांना भात लागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हे शेतकरी पुराच्या पाण्यात तग धरून राहील अशा जातीच्या शोधात होते. गेल्यावर्षी पुसा येथील (बिहार) राजेंद्र कृषी विद्यापीठाने चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना “स्वर्ण-सब-1′ ही जात लागवडीसाठी उपलब्ध करून दिली. चंपारण जिल्ह्यात दरवर्षी किमान आठ ते 12 दिवस पुराचे पाणी शेतामध्ये थांबून राहते, त्यामुळे भात रोपे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते; परंतु गेल्यावर्षापासून शेतकऱ्यांनी “स्वर्ण-सब-1′ या जातीची लागवड पूरग्रस्त भागात सुरू केली. ही जात पुराच्या पाण्यात तग धरून राहिली, तसेच पूर ओसरल्यानंतर रोपांची चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांना या जातीपासून प्रति हेक्‍टरी सरासरी पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. या जातीच्या तांदळाचा दर्जा चांगला आहे, त्याचबरोबरीने भातही लवकर शिजतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे “स्वर्ण-सब-1′ ही जात शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या जातीच्या संशोधकाला भेटण्याची शेतकऱ्यांची इच्छा हाती, ती यंदाच्या एप्रिल महिन्यात पूर्णही झाली.
एप्रिल महिन्यात डॉ. मॅकील हे भारतातील संशोधन केंद्रांच्या दौऱ्यावर होते. हे शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनी राजेंद्र कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. जे. पी. सिंग यांच्या माध्यमातून भेटीचे आमंत्रणही दिले. शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देत डॉ. मॅकील 8 एप्रिल रोजी समौता गावात दाखलही झाले.
या वेळी चंपारण जिल्ह्यातील सुमारे साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत खास समारंभात डॉ. मॅकील यांचा “शेतकऱ्यांचा मसिहा’ म्हणून गौरव केला. या वेळी शेतकऱ्यांनी “स्वर्ण-सब-1′ या जातीच्या लागवडीचे अनुभव, तसेच भात शेतीमधील अडचणी सांगितल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भाताच्या जातींच्या निर्मितीमध्ये तशा पद्धतीने संशोधन सुरू असल्याची ग्वाही डॉ. मॅकील यांनी दिली.

पुरात तग धरणारी “स्वर्ण-सब-1′
आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार डॉ. मॅकील यांनी पुराच्या पाण्यातही तग धरून राहणाऱ्या “स्वर्ण-सब-1′ या जातीची निर्मिती केली. ज्या ठिकाणी दरवर्षी पुराचे पाणी आठ ते 10 दिवस साचून राहते, त्या भागात या जातीची लागवड फायदेशीर दिसून आली आहे. जगभरातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या जातीच्या लागवडीमुळे शाश्‍वत उत्पादनाची खात्री मिळणार आहे.

Leave a comment

हवामानबदल वेलदोडा

हवामानबदल व तापमानवाढीमुळे जगभरात विविध समस्या निर्माण होताना दिसत असल्या तरी वेलदोडा पिकासाठी मात्र हा बदल फायदेशीर ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी अभ्यास करून तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल नुकताच “हवामान बदल’ विषयक दैनिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, वेलदोडा लागवड केलेल्या भागातील तापमानवाढीमुळे पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले. बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि सेंटर प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट, कयमकुलम (केरळ) येथील संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे गेल्या 17 वर्षांपासून यावर अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. त्यातील निष्कर्षानुसार हवामानबदल व तापमानवाढीचा वेलदोडा, कॉफी, चहा आणि काळी मिरी या पिकांवर चांगला परिणाम होत असल्याचे आढळले. रात्रीच्या किमान तापमानात झालेली वाढ आणि दिवसाचे कमाल तापमान वाढल्यामुळे वातावरणात एकप्रकारे ऊब निर्माण होऊन त्याचा फायदा वेलदोड्याच्या उत्पादनवाढीसाठी तसेच काहीसा कॉफीच्या उत्पादनासाठीही होत आहे. याबाबत केरळ येथील वेलदोडा संशोधन केंद्राचे सहायक प्राध्यापक मुथुसामी मुरुगन यांनी सांगितले, की वेलदोड्याच्या उत्पादनात वाढ होण्यास गेल्या शतकापासून सुरवात झाली. 1990 मध्ये प्रति हेक्‍टरी उत्पादन 84 किलो मिळत होते. 1994 मध्ये त्यात वाढ होऊन प्रति हेक्‍टरी 136 किलो उत्पादन मिळू लागले. 2007 मध्ये हे उत्पादन प्रति हेक्‍टरी 300 किलो मिळाले. एनजालानी, पीव्ही-1 या जाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर ठरल्या. चहा आणि काळी मिरीच्या उत्पादनवाढीसाठी अनेक वर्षे काम करूनही त्यावर उपाय मिळत नव्हता, मात्र हवामानबदल व तापमानवाढीमुळे ते शक्‍य झाले आहे.

Leave a comment

द्राक्षवेलीच्या वाढीकडे लक्ष ठेवा

सध्या पावसाळी वातावरण असल्याने द्राक्ष बागेत काही चांगल्या घडामोडी होत आहेत, तर काही ठिकाणी थोड्याफार समस्या दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागेत काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये घेत आहोत.

नवीन बाग :
पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढली आहे. ती आर्द्रता वेलीच्या शाकीय वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे; परंतु हीच आर्द्रता जास्त वाढली असल्यास आणि बागेत जर पाऊस असेल, नवीन फूट वाढत असल्यास अशा वेळी बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता राहील. या बागेत पाऊस झाला असल्यास नवीन फुटींवर थोड्याफार प्रमाणात करपा दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच करपा नियंत्रण फायद्याचे राहील.
ही फूट निघत असताना आपल्याला वाढीचा जोम जास्त दिसेल. या जोमाचा फायदा व्हावा म्हणून आपण ओलांड्यावर पुन्हा दोन ते तीन काड्या मिळतील. या दृष्टीने प्रयत्न करत असतो; परंतु जर वाढीचा जोम जास्त असेल तर वेलीमध्ये जिब्रेलीन्सचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचा विपरीत परिणाम घडनिर्मितीवर होऊ शकतो. पुन्हा वातावरण जर ढगाळी असेल तर घडनिर्मिती होण्याकरिता बाधा निर्माण होऊ शकते.
वेलीची वाढ चांगली व्हावी या दृष्टीने आपण नत्र व स्फुरदची पूर्तता करतो, तेव्हा दिलेले अन्नद्रव्य व त्याचसोबत वाढती आर्द्रता यामुळेच बागेत वाढीचा जोम जास्त दिसतो. अशा परिस्थितीमध्ये बागेत नत्रयुक्त खताचा वापर काही काळाकरिता बंद करावा. याचसोबत अपेक्षेप्रमाणे घडनिर्मिती होण्याच्या दृष्टीने शिफारशीत संजीवकाचा वापर या वेळी महत्त्वाचा राहील.
बऱ्याचशा बागेत या वेळी पानावर अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. रिकट घेतल्यानंतर बागेत पहिल्या वर्षी ही समस्या आढळून येते. यामध्ये लोह व मॅग्नेशिअमची कमतरता प्रामुख्याने दिसते. बागेत पाने पिवळी पडणे व पाण्याच्या कडा पिवळ्या पडणे या महत्त्वाच्या समस्या या वेळी बागेत आढळून येतात.
अन्नद्रव्यांच्या या कमतरतेमुळे बागेत वेल अशक्‍य होत असून, त्यानंतर वातावरणाचा समतोल बिघडला असल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कमी प्रमाणात फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेटची शिफारशीत मात्रेमध्ये दोन ते तीन वेळा फवारणी करावी. त्याचसोबत जमिनीतूनसुद्धा या घटकांचा पुरवठा करावा.

जुनी बाग :
या बागेत काडी परिपक्व होत आहे. काडी तळातून दुधाळ रंगाची होत असताना काडी परिपक्वतेकडे वळली आहे, असे आपण म्हणतो. ही काडी परिपक्व होण्याच्या दृष्टीने तारेवर काड्या बांधून घेणे महत्त्वाचे समजावे. यामुळे कांड्यामध्ये गुंतागुंती होणार नाही, म्हणजेच मोकळी कॅनॉपी असेल तर त्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल. कॅनॉपीमध्ये मिळालेले हे वातावरण काडीची परिपक्वता लवकर करून घेण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे आर्द्रता कमी झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्‍यता कमी राहील.
या वेळी बागेत पावसाळी वातावरणामुळे नवीन फुटींची वाढ जास्त होताना दिसून येईल. ही फूट जास्त वाढल्यास अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊ शकतो. तेव्हा एकतर पालाशची पूर्तता करून काडी लवकर परिपक्व करून घ्यावी, म्हणजे वाढ थांबेल किंवा फुटी वेळीच काढून टाकाव्यात. यामुळे रोगावर नियंत्रण ठेवता येईल. जुन्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, तेव्हा या रोगावर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील.

Leave a comment

सेझ आणि शेतकरी

ह्या देशाला शेतकऱ्यांची नव्हे तर औद्योगिक कामकऱ्यांची गरज आहे. देशातील ६०% हून अधिक लोक शेतात काम करतात (आणि त्यातही ४०% लोकांना फक्त एकाच हंगामात काम मिळते!). हे सगळे हात देशाच्या आर्थिक समृद्धिला हातभार लावायला असमर्थ आहेत कारण रोजगार निर्माण करण्याच्या नावाखाली शेतजमिनीच्यामालकांना सरकार वाटेल त्या सवलती देते, पण ह्या सवलती घेउनही शेताचे उत्पादन वाढत नाही. अणि कसे वाढणार उत्पादन? देशाची लोकसंख्या गेल्या ६० वर्षात दुपटीहून अधिक झाली, पण शेतजमीन काही वाढली नाही. शिवाय काम करणाऱ्यांपेक्षा काम मागणारे अधिक असल्यामुळे त्यांचे शोषण चालू आहे. अमेरिकेत लोकसंख्येच्या फक्त २% लोक शेतात काम करतात, आणि तरीही अमेरिकेचे धान्य उत्पादन भारतापेक्षा जास्त आहे. ह्याचे कारण असे की जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून जर शेती केली तर ती किफायती ठरत नाही. धान्याबरोबरच ह्या देशाला इतर साधनसामुग्रीचीही गरज आहे, पण ती निर्माण करण्यासाठी पुरेसे उद्योगधंदे आणि तंत्रज्ञान देशाकडे नसल्यानेह्या गोष्टी बाहेरून आयात कराव्या लागतात. शेतावर राबणारे हे हात जर जर औद्योगिक कामाकडे वळवले तर देशाची परिस्थिती सुधारेल. औद्योगिक क्षेत्रात देशातले १२% लोक काम करतात आणि देशाचे जवळजवळ ३०% उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) काढतात. ह्याउलट, शेतकी व्यवसायात देशातले ६०% हून अधिक लोक काम करतात आणि केवळ १७% उत्पन्न काढतात. यावरून हे दिसून येईल की शेतावर काम करणाऱ्या मजुरांपेक्षा, औद्योगिक मजुरांची उत्पादन क्षमता काही पटींनी अधिक आहे. सोपा हिशेब आहे: देशातल्या ४०% शेत कामकऱ्यांना जर औद्योगिक क्षेत्राकडे वळवले तर देशाचे उत्पन्न ३ पटींनी वाढेल. अर्थात हे काही एका दिवसात होणार नाही, पण गेल्या ६० वर्षात नक्कीच करता आले असते. पण गांधीजींच्या भोंगळ कल्पनांमध्ये गुंतून देशाने आपले नुकसान करून घेतले आहे. शिवाय औद्योगिकीकरणामुळे शोषणही कमी होते, कारण औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग संघटीत आहे (लेबर युनियन्स), पण शेतमजुरांचे असे संघटन फार कमी प्रमाणावर बघायला मिळते.

Leave a comment

शेतकर्‍याला गाय

“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.”
त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ.कोकणातून येणारा फळांचा आणि भाज्यांचा माल जाधव आपल्या दुकानात ठेवतात.आंब्या फणसाच्या मोसमात कोकणातून ट्रक भर-भरून माल आणून ह्या दुकानात विकला जातो.अलीकडे तर रोजच एक दोन ट्रकांची कोकणातून येण्या-जाण्यात फेरी होत असल्याने, चाफ्याची,आबोलीची,मोगर्‍याची ताजी फुलं,तसंच गणपतिच्या सणात कमळाची,आणि लाल रंगाची ताजी फुलं पण आणून ठेवतात. हार-वेण्या करण्यासाठी फुलं विकत घेण्यासाठी फुलवाल्यांची दुकानात रोजचीच गर्दी असते.
एकदा गप्पा मारत असताना जाधव मला म्हणाले,
“केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला सांगा.परतीच्या ट्रकात बसून आपण माझ्या बरोबर या. कोकणात जाऊंया. माझ्या भावाची छोटीशीच शेती आहे.तुम्हाला त्यांचं जीवन पहायला मजा येईल.”
आणि तो दिवस उजाडला.मी धनाजीबरोबर दोन चार दिवस रहायला त्यांच्या भावाच्या गावी गेलो होतो.
“आमच्या पूर्तिच शेती करायला मला आवडतं.मी आणि माझी बायको ह्या शेतावर मेहनत घेतो.आमच्या मेहनतीच्या पैशाने हे शेत आणि थोडी गुरं आम्ही विकत घेतली.हा सारा व्याप सांभाळताना आम्ही आमच्या दोन मुलांची जोपासना पण करीत असतो.”
खंभिरराव जाधव,मला माहिती देत होते.
दुसर्‍या दिवशी मी खंभिररावांच्या शेतावर फेरफटका मारायचं ठरवलं होतं.त्याशिवाय त्यांच्या गाईच्या दुधाच्या व्यवसायचं त्यांच्या भावाकडून ऐकलं होतं,त्याचंही कुतूहल माझ्या मनात होतं.ते पण पहाणार होतो.आणि वेळ मिळेल तेव्हा खंभिररावांशी गप्पा मारून माहिती काढायचं ठरवलं होतं.
शेतीची आणि त्याशिवाय दुधदुभत्याची कामं हाती घेतल्यावर ह्या व्यवसायात माणूस दिवसाचे चौविस तास व्यस्त असतो हे मला माहित होतं.
पण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी जाधवांना म्हणालो,
“हा शेतीचा धंदा असा आहे की तुमच्या रोजी-रोटीवर होत असणारे परिणाम बाह्य कारणावर अवलंबून असतात. आणि त्यावर तुमचं कसलही नियंत्रण नसतं.हवामान हा एक मोठा मुद्दा असतो.हे सर्व बाह्य परिणाम जेव्हा तुमच्या विरूद्ध जातात तेव्हा शेतीचा धंदा निमूट चालण्यात जास्त किफायतशीर असतो असं मी ऐकलं आहे ते खरं काय?”.
खंबिरराव हंसत हंसत मला म्हणाले,
“खूप थकायला होत असणार नाही काय?”
असं शेती न करणारी आमची मित्रमंडळी आम्हाला विचारतात.
माझं म्हणणं, खरंच थकायला होत असतं.
पहाटे चारला उठण्याचा प्रघात दिवसानी -दिवस ठेवावा लागतो.
पण यातही अभिमान वाटण्याची समाधानी आणि आमच्या स्वमेहनतीमुळे हे घडतंय हे पाहूनच आमचा मार्ग चाललेला असतो.”
मी म्हणालो,
“ह्या नकारात्मक वृत्तिने भरलेल्या समुद्रात शेती नकरणारे हे लक्षात का आणू शकत नाहीत हे कळायला जरा कठीणच जातं.”
“ह्या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात शेती असताना सहभाग घेणार्‍यांना खूपच कष्ट पडत असतील यात वाद नाही. परंतु,आम्ही सांभाळतो तसं छोटंसं शेत सांभाळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा व्यवसाय एव्हडा हाडां-मासांत खिळलेला असतो की काहीतरी गोष्ट करीत राहाण्याशिवाय गत्यंतरच नसतं.हा व्यवसाय करताना पैशावर डोळा ठेऊन आम्ही करीत नाही.आंतरीक इच्छेमुळे आम्ही त्यात आहोत.”
खंभिररावानी आपलं प्रांजाळ मत दिलं.
“गाईच्या दुधाच्या व्यवसायाचा व्याप कसा असतो हो?”
मी खंभिररावांना लगेचच विचारलं.
“तेही तितकंच कटकटीचं असतं,पण कुठच्याही कामावर प्रेम असल्यानंतर त्याची कटकट भासत नाही.उलट उमेद येते.”
खंभिरराव सांगायला लागले.
“सकाळीच उठून गाईंच्या आंचूळ्या धूवून मग दूध काढताना दुधाच्या आठ-दहा चरव्या भरून निघाल्यावर संतुष्ट होण्यात इतकं समाधान वाटतं की काय सांगावं.ह्या गुरांना खाणं-पिणं व्यवस्थीत गेल्याने दुधाचा रतीब वाढतो. आपल्या आईचं दुध लुचून लुचून, पाडसं गुबगुबीत होतात.आणि वयात आल्यावर गाभण राहून मग विहिल्यानंतर परत दुधाच्या पुरवठ्यात भर टाकायला मदत करतात.
काही गाई भाकड झाल्यावर गुराख्याबरोबर माळावर चरायला पाठवल्यावर उरलेल्या दुभत्या गाई दुधाची उणीव भरून काढतात.”
भाकड गाईंबद्दल मला बर्‍याच शंका होत्या.आणि काही अपसमजही मी ऐकले होते.प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या तोंडून “फ्रॉम हॉरसीस माऊथ” म्हणतात तसं होईल म्हणून मी जाधवांना विचारलं,
“ह्या भाकड गाई नंतर कसायाकडे दिल्या जातात, असं मी ऐकलं होतं.किती खरं आहे?”
“छे,छे! कुणी सांगीतलं तुम्हाला?”
माझ्या प्रश्नाने जाधव जरा वैतागल्या सारखे मला वाटले.
मला म्हणाले,
“कोकणातला शेतकरी हे पाप कधीच करणार नाही.गाईला देवी कशी मानली जाते.गाई भाकड झाल्या तरी काय झालं? ती गाईची तात्पुरती अवस्था असते.गुराख्याकडे भाकड म्हणून दिलेल्या गाई त्यांचा फळायचा मोसम आल्यावर त्या फळल्या जातात. एखाद दुसरी गाय सोडल्यास उरलेल्या गाई गाभण राहिल्या हे ऐकून पुढच्या मोसमात जादा दुधाच्या चरव्या भरणार ह्याचा विचार आमच्या मनात येऊन चार पैसे गाठीला जमतील मुलांना
दिवाळीत नवीन कपडे घेता येतील याची जाणीव होऊन आम्हा दोघां नवरा-बायकोना मेहनतीचं सार्थक होतंय हेच उलट तृप्तिचं कारण बनतं.”
असा प्रश्न का केला ह्याचा संदर्भ देताना मी जाधवांना म्हणालो,
“वांद्र्याला फार पूर्वी कसाईखाना होता.आता तो तिकडून उचकटून टाकला आहे.त्या दिवसात बाहेर गावाहून गुरांचा कळप मुंबईला कत्तल खान्यात घेऊन यायचे हे मी पाहलंय.ती गुरं कुठून यायची ह्याची कल्पना नाही.”
“त्या गुरांच्या कळपाचं मला काही माहित नाही.”
असं म्हणून खंभिरराव मोठ्या अभिमानाने आणि सद्गदीत होऊन सांगू लागले,
“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.
खाण्या पिण्यात त्यांची यत्किंचही आबाळ करीत नाही.आणि दुर्दैवाने त्या म्हातार्‍या गाई निर्वतल्या तरी आम्ही शेताच्या बाहेर माळरानावर खड्डा करून पुरतो.अक्षरशः घरातलं माणूस गेल्या सारखं शेतकर्‍याला दुःख होतं.दोन दिवस आम्ही उपास केल्यासारखे रहातो.त्यावर्षी आम्ही सणसोहळा सुद्धा करीत नाही.घरातली लहान मुलं सुद्धा दुर्मुखलेली रहातात.गेलेल्या गाईचं कातडं पायतानासाठी वापरायला महार-चांभार पूर्वी यायचे.पण पैशासाठी
म्हणून सुद्धा कोकणी शेतकरी गरीब झाला म्हणून ह्या मार्गाला जाणार नाही.”
चर्चा बरीच अशी भावूक होत आहे असं पाहून मी जरा विषय बदलण्याचा विचार करून जाधवांना म्हणालो,
“शेती कामात अवजारं वापरायची झाली म्हणजे त्यात दुरूस्थी-नादुरूस्थीच्या कटकटी आल्याच.पण ती अवजारं पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणल्यावर मनःशांती मिळते ती वेगळीच असते.तुम्हालाही तसं होत असेल नाही काय?”
“मनःशांती,आनंद,समाधानी आणि उत्कंठा असले प्रकार शेतकर्‍याच्या जीवनात येतच असतात.”
खंभिररावानाही मी विषय बदलल्याचं जाणवलं असावं.
मला म्हणाले,
“दोनचार कुंणग्यात भातशेती रोवून पिकं आल्यावर जमा केलेला तांदूळ गोण्या भरून मांगरात रचून ठेवायला आनंद होतो.शेती संपल्यावर त्याच जागेत मिरची,डांगर भोपळे,मुळा अशी भाजीची पिकं काढायला,आमचा आवर बेताचाच असल्याने मेहनत घ्यायला परवडतं.
कामं अजिबात न संपणार्‍या ह्या व्यवसायात काहीतरी संपादन केलं ह्याची समाधानी औरच असते.मग ते काम तांदळाची तूसं काढण्याचं असो किंवा गायरीतलं खत उपसून कुंणग्यात पसरवण्याचं असो, कशाचाही आधाराने, कोणतही काम त्या मोसमापुरतं झालं म्हणजे फत्ते.हवामान खात्याने दिलेलं भाकित खोटं ठरून येणारं वावटळीचं वादळ पुर्वेच्या दिशेने निघून गेल्याचं पाहून सुटकारा मिळाल्यावर मनही प्रफुल्लीत होतं.”
चर्चेचा शेवट आनंदात होतोय असं पाहून मी खंभिररावाना म्हणालो,
“आणि सर्वात उत्तम गोष्ट ही की तुमची मुलं रोज तुमच्या सहवासात असतात ह्याचं महत्व किती मोठं आहे.मेहनतीची फळं मिळाल्याचं पाहून त्यांना परिश्रमाची मुल्यं कळतात हे पाहून तुमचं समाधान होत असेल हे ही तितकंच महत्वाचं आहे.आणि तुमच्या मुलांच्या तोंडात आरोग्यजनक आणि पौष्टीक अन्न पडतं हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं तुमच्या मुलांना वाटणं हे ही खूप समाधानाचं आहे.
अगदी खूश होऊन जाधव मला म्हणाले,
“म्हणूनच मला शेती आवडते.”
दुसर्‍या दिवशी आणि माझ्या पुर्‍या मुक्कामात मी,खंभिरराव आणि त्यांचे धाकटे बंधू धनाजी यांच्यासह मनसोक्त पाहूणचार घेतला हे सांगायला  नकोच.

Leave a comment

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारी

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये माती परीक्षण, जमिनीची पूर्वमशागत, बियाण्याची तरतूद, सेंद्रिय व रासायनिक खतांची त्याचप्रमाणे जिवाणू खतांची उपलब्धता करून ठेवणे, कीटकनाशकांची तसेच पेरणी अवजारे व हत्यारांची दुरुस्ती या बाबींचा समावेश होतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण उपयोगी ठरते. माती परीक्षणानुसार पिकास द्यावयाची खताची मात्रा निश्‍चित करता येते. जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये शेतात ढेकळे असल्यास ती बोड किंवा मैंदाच्या साह्याने फोडून घ्यावीत, जमिनीस उंच-सखलपणा असल्यास तिफणीने सपाट करावी. आडव्या-उभ्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात, शेवटच्या कुळवणीअगोदर शिफारशीप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. जमिनीची बांधबंदिस्ती करून पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.

पीक उत्पादनवाढीसाठी संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा महत्त्वाचा वाटा असल्याने पेरणीसाठी बियाण्याची निवड करताना जास्त उत्पादन देणाऱ्या, खतास चांगला प्रतिसाद देणाऱ्या, कमी कालावधीत व कमी पाण्यात येणाऱ्या तसेच रोग व किडीस प्रतिकारक्षम असणारे वाण निवडावेत. शक्‍यतो प्रमाणित बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणे खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाचे/ जातीचे नाव, उगवणक्षमता इत्यादी सर्व गोष्टी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून त्याची पक्की पावती घ्यावी. विकत घेतलेल्या बियाण्याच्या पिशवीस असलेले लेबल व टॅग जपून ठेवावा, यदाकदाचित बियाण्यात काही दोष आढळल्यास बिल, लेबल व टॅगची संबंधितांकडे तक्रार करताना गरज पडते.

पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी पिकानुसार शिफारस केलेल्या जिवाणू खतांची खरेदी करून ठेवावी. ज्वारी, बाजरी, भात, मका या एकदल व तृणधान्ये पिकासाठी ऍझोटोबॅक्‍टर, शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी रायझोबियम हे जिवाणू संवर्धक वापरावे. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम वापरावे. स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा आवश्‍यकतेनुसार बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.

पूर्वहंगामी कापूस लागवड ठिबक सिंचनावर केल्याने सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पिकाची वाढ जोमदार होते, लवकर फुले येतात. पर्यायाने हा कापूस हंगामी कापसाच्या तुलनेत वेचणीसाठी 20 ते 25 दिवस लवकर तयार होतो आणि उत्पादनात भरीव वाढ होते.

पूर्वहंगामी कापूस पिकासाठी उष्ण, कोरडे व कमी आर्द्रतायुक्त हवामान मानवते. या काळात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्वहंगामी कापूस पीक 25 ते 30 दिवसांचे होऊन त्यास पाते लागण्यास सुरवात होते. ठिबक सिंचनावर आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड योग्य वेळी करता येते व या पिकास पाण्याचा कोणताही ताण बसत नाही. सर्वसाधारणपणे पाच अश्‍वशक्तीचा पंप ताशी 18 ते 21 हजार लिटर पाणी देतो. एवढ्या पाण्यावर कमीत कमी दोन ते अडीच एकर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ठिबक पद्धतीने करणे शक्‍य आहे.

जमिनीची निवड ः
मध्यम ते भारी, काळी, कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. हलक्‍या, उथळ आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे.

पूर्वमशागत ः
एक खोल नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकाची धसकटे, पाला व काडीकचरा गोळा करून तो जाळावा व शेत स्वच्छ करावे. शेवटाच्या कुळवाच्या पाळीअगोदर 15 ते 20 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
ठिबक सिंचन संच उभारणी ः
पूर्वमशागत झाल्यावर शेताची पाहणी करून आराखडा तयार करावा. आराखड्याप्रमाणे ठिबक संचाची उभारणी करावी. पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. कापूस पिकासाठी ड्रीपरचा प्रवाह चार लिटर प्रति तास असलेल्या 12 किंवा 16 मि.मी. इनलाईन नळीची निवड करावी. इनलाईन नळीच्या दोन ड्रीपरमधील अंतर 60 सें.मी. किंवा 90 सें.मी. असावे. ठिबक सिंचन पद्धतीत जोडओळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे प्रति हेक्‍टरी झाडांची संख्या कायम राहून खर्चात बचत होते, तसेच पीक फवारणी, आंतरमशागत व कापूस वेचणी ही कामे सोईस्कर राबविता येतात.
लागवड व्यवस्थापन ः
ठिबक सिंचन आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातींची निवड करावी. बी.टी. कापसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या व जास्त फळफांद्या असणाऱ्या जातीची निवड करावी. लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, जाती इ. बाबींचा विचार करावा. लागवडीसाठी बियाणे लावण्यापूर्वी (पेरणीपूर्वी) 12 ते 14 तास ठिबक संच चालवून शेतात वाफसा होईपर्यंत ओलावा निर्माण करावा. नंतर शिफारस केलेल्या अंतरावर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 60 ते 120 ु 90 सें.मी. किंवा 90 ते 180 ु 105 ते 120 सें.मी. अशा अनेक जोडओळ किंवा पट्टा पद्धतीने ठिबक संचालगत लागवड करावी. लागवड करताना इनलाईन नळीचे ड्रीपर व बियाणे लागवडीची जागा जवळ येतील याची काळजी घ्यावी.

Leave a comment

उझी माशीचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरणामुळे रेशीम कीटकांवर उझी माशी या उपद्रवी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. या माशीची माहिती व त्यावर करावयाच्या उपायांविषयी माहिती करून घेऊ.

उझी माशी ही उपद्रवी कीड असून, तिच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमध्ये नुकसान होत असल्याचे दिसून येते. देशात कर्नाटकच्या शेजारील राज्ये आंध्र प्रदेश व तमिळनाडू या ठिकाणी सन 1981-82च्या दरम्यान या माशीचा प्रादुर्भाव व प्रसार झाला. गेल्या काही महिन्यांपासून काही जिल्ह्यांमध्ये उझी माशीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झालेली आहे. उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 10 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

या माशीच्या जीवनचक्रातील अंडी, मॅगट, प्युपा, माशी या चार अवस्था आहेत. नर उझी माशी मादी उझी माशीच्या तुलनेत आकाराने मोठी असते. पाठीवर गडद काळ्या रंगाचे चार उभे पट्टे असतात. ही माशी 300 ते 1000 पर्यंत अंडी घालू शकते. ही माशी शक्‍यतो चॉकी अवस्थेतील रेशीम कीटकांवर अंडी घालण्याचे टाळते, तर आकाराने मोठ्या असलेल्या प्रौढ रेशीम कीटकांना भक्ष्य बनवते. अंडे घातल्यापासून एक-दोन दिवसांत अंड्यातून मॅगट बाहेर येतो, ज्याचा रंग पिवळसर पांढरा असतो. मॅगट रेशीम कीटकाच्या नाजूक त्वचेला छिद्र पाडून कीटकाच्या शरीरात प्रवेश करतो. ज्या ठिकाणाहून तो प्रवेश करतो, त्या ठिकाणी काळ्या रंगाचा डाग दिसून येतो. परिपूर्ण वाढ झालेला क्रीम व्हाइट रंगाचा मॅगट संगोपनगृहातील रॅकमध्ये, जमिनीला असलेल्या भेगांमध्ये अथवा कीटक संगोपनगृहातील कोपऱ्यांमध्ये अंधाऱ्या जागी वाटचाल करतो. या ठिकाणी त्याची पुढील प्युपा अवस्था सुरू होते. प्युपा अवस्था 10 ते 12 दिवसांची असते. प्युपाचा आकार लंबगोलाकार/दंडाकृती असून, प्रौढ प्युपाचा रंग गडद तपकिरी असतो. या प्युपामधून मादीच्या तुलनेत नर उझी माशी अगोदर बाहेर येते. उझी माशीचा जीवनाचा कालावधी 17 ते 18 दिवसांचा असतो. या एकूण कालावधीपैकी चवथ्या ते सातव्या दिवसांपर्यंत मोठ्या प्रमाणात अंडी घालते. नर माशीपेक्षा मादी माशीचा जीवनकाल अधिक असतो. उझी माशी 1000 ते 2000 मीटरपर्यंत उडू शकते

नियंत्रण
भौतिक, रासायनिक व जैविक उपायांनी नियंत्रण करणे शक्‍य आहे.
भौतिक उपाय – कीटक संगोपनगृह, कोष खरेदीकेंद्र, अंडीपुंजनिर्मिती केंद्र, रेशीम धागानिर्मिती केंद्र इ. ठिकाणांवरील मॅगट व प्युपा गोळा करून जाळून नष्ट करावा किंवा 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात नष्ट करावा. जमिनींना असलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. उझी माशीच्या प्रादुर्भावास बळी पडलेले रेशीम कीटक गोळा करून नष्ट करावेत.

पाचव्या अवस्थेतील रेशीम कीटकांस प्रादुर्भाव झाला असेल, तर असे प्रादुर्भावित रेशीम कीटक इतर रेशीम कीटकांच्या तुलनेत दोन दिवस अगोदर कोष बांधतात. असे कोष मॅगट बाहेर येण्यापूर्वीच गोळा करून त्यांवर कोष ड्राय करण्याची प्रक्रिया करावी, ज्यामुळे कोषातील मॅगट मरून जाईल व कोषांचे नुकसान होणार नाही. उझी माशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणावरून कोष, मॅगट, प्युपा येणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या गावांतील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या एक-दीड महिना पीक बंद ठेवावे, ज्यामुळे उझी माशीच्या जीवनचक्रात निसर्गतःच अडथळा निर्माण होऊन तिच्या प्रसारावर नियंत्रण मिळविता येईल. कीटक संगोपनगृहाच्या खिडक्‍या व तावदाने इत्यादींना नायलॉन जाळीने झाकून घ्यावे, यामुळे जवळपास 20 ते 22 टक्के नियंत्रण मिळविता येते. चॉकी ट्रे, तसेच रॅक नायलॉन जाळीने झाकून ठेवावे, यामुळे उझी माशीला अंडी घालणे शक्‍य होणार नाही.

किडीची लक्षणे
रेशीम कीटकाच्या शरीरावर लहान एक ते दोन अंडी असणे किंवा रेशीम कीटकाच्या त्वचेवर काळ्या रंगाचा डाग असणे किंवा कोषाला छिद्र पाडून मॅगट बाहेर आलेला असणे.

उझी माशीचा प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेत झालेला असल्यास रेशीम कीटक कोषावस्थेपूर्वीच मृत होताना आढळतात, जर प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या पाचव्या अवस्थेत झालेला असेल, तर पोचट कोषांची निर्मिती होते. होणारे नुकसान 10 ते 30 टक्के असते.

Leave a comment

फळरोपवाटीका

शासकीय फळरोपवाटीका व्यवस्थापन
फलोत्पादनाकडे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतकरी ओळखतात. विविध फळ पिकांना असलेले पोषक हवामान विचारात घेता, ज्या फळपिकांना ज्या विभागात वाव आहे त्या विभागात त्या विभागात त्या त्या फळपिकांच्या रोपवाटीकांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या राज्यात १ राज्यस्तरीय, २९ जिल्हास्तरीय, १०४ तालुकास्तरीय आणि २ पश्चिमघाट विकास अंतर्गत अशा एकूण १३६ फळ रोपवाटिका कार्यरत आहेत. राज्यात सन १९९०-९१ पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी आवश्यक कलमा / रोपाची उपलब्धता राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठ व पंजीकृत खाजगी रोपवाटीकांवरून करण्यात येत आहे. आज राज्यात १३६ शासकीय फळरोपवाटीकांबरोबरच कृषी विद्यापीठांच्या ४२ तर १३०० पंजीकृत खाजगी रोपवाटीका स्थापन झालेल्या आहेत. या सर्व रोपवाटीकांवर सध्या सुमारे २.५ ते ३.०० कोटी कलमे व रोपे उपलब्ध होतात.
सन २००७-०८ या वर्षात शासनाने रोहयो अंतर्गत व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवडीसाठी ७८,००० हेक्टरचे लक्षांक ठरविले असून त्यासाठी २.९४ कोटी कलमे / रोपे आवश्यक आहेत. या सर्व फलोत्पादन विकास कार्यक्रमांसाठी तसेच रोख विक्रींसाठी शासनाने कलमा / रोपांचे विक्रीवर निश्चित केलेले आहेत. सदरच्या विक्रीदराचा तपशील शेतकरी मासिकाच्या माहे ऑगस्ट-२००७ च्या अंकात पृष्ठ क्रमांक ४१ वर दिलेला आहे.

Leave a comment

स्वर्णजयंती

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
प्रस्तावना :
विविध आघाड्य़ांबर देशाने प्रभावी प्रगति केलेली असूनही दारिद्र्य नेहमी गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. देशाच्या विकासावर गरिबीच्या एका विशाल टक्केवारीचा प्रभाव उघड आहे. आम्हाला स्थिति ताबडतोब दूर करण्याची आवश्यकता आहे. हे ह्या संदर्भा मध्ये आहे की, स्वरोजगार कार्यक्रमाने महत्व प्राप्त केले आहे. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना गरीब ग्रामीण लोकांकरिता एकल स्वरोजगार कार्यक्रम आहे. ह्याची सुरुवात 1-4-1999 मध्ये झाली. हा कार्यक्रम आधीच्या स्वरोजगार व संबद्ध कार्यक्रमांचे पुन:स्थापन करतो. आयआरडीपी, टीआरवाय एसईएम, डीडब्ल्यूसीआरए, एसआयटीआरए, जीकेवाय व एमडब्ल्यूएल, ज्या दिर्घकाळापासून व्यवहारामध्ये नाही आहेत. स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे (एसजीएसवाय) गरीब ग्रामीण लोकांच्या सामर्थ्यशाली निर्माणाकरिता ग्रामीण क्षेत्रांमध्ये सू्क्ष्म-उपक्रमांची एक विशाल संख्या स्थापित करण्याचे ध्येय आहे. हे ह्या विश्वासामध्ये निर्दिष्ट आहे की, भारतात ग्रामीण गरीब लोक सक्षम आहेत व योग्य आधार देतात, ज्यामुळे ते बहुमूल्य सामान/सेवेचे सफल निर्माता बनू शकतील. ह्या कार्यक्रमांतर्गत सहाय्य दिलेल्या व्यक्ति स्वरोजगारी रुपात ज्ञात होतील व लाभाधिकारी म्हणून नाहीत.
लाभ कोणाला मिळेल :
एसजीएसवाय एक नवीन व काळजीपूर्वक साद्यंत योजना आहे. यामध्ये अगोदरच्या स्वरोजगार कार्यक्रमांची सर्व ताकद व दौर्बल्य विचारात घेण्यात आले आहे. ही उधार व सहाय्याचा योग्य समतोल प्रस्तुत करते. हा कार्यक्रम ग्रामीण गरीब लोकांची शक्तता व अंगभूत गुणांना उच्च स्थान प्रदान करण्यासाठी उचित आधार व उत्तेजन देण्याकरिता बनविण्यात आला आहे. हा कार्यक्रम त्यांच्यामधील अधिक दुबळ्यांना लक्ष्य बनविल. कमीत कमी 50% स्वरोजगारी अजा/अज, 40% महिला व 3% विकलांग असतील.
ग्राम सभा बीपीएल जनगणनेमध्ये अभिज्ञात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची यादी अधिप्रमाणित करेल. व्यक्तिगत स्वरोजगारीची ओळख एका सहभाग प्रक्रिये मार्फत करण्यात येईल. एसजीएसवायचा एक महत्त्वाचा पैलू हा आहे की, ह्या कार्यक्रमा अंतर्गत सहाय्य देण्यात आलेले प्रत्येक कुटुंब तीन वर्षामध्ये दारिद्र्य रेषेच्या वर आले पाहिजे आणि म्हणून कार्यक्रमाचे ग्रामीण गरीब लोकांकरिता भरीव अतिरिक्त आय निर्माण करण्याचे ध्येय आहे. निधींच्या उपलब्धतेच्या अधीन ह्याचा पुढील पाच वर्षामध्ये प्रत्येक गटामध्ये 30% ग्रामीण गरीब लोकांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
त्यांना लाभ कसा मिळेल ?
एसजीएसवाय स्वरोजगाराच्या सर्व बाजू उदा. स्वयं मदत समूहांमध्ये (एसएचजी) ग्रामीण गरीब लोकांची संघटना व त्यांचे क्षमता निर्माण, कार्य समूहांचे नियोजन, संसाधन निर्माण तंत्रशास्त्र, उधार व पणन समाविष्ट करणारा सूक्ष्म-उपक्रमांचा एक संपूर्ण कार्यक्रम रुपात कल्पित आहे.
एसजीएसवाय एक उधार-सह-सहाय्य कार्यक्रम आहे. उधार एसजीएसवाय मध्ये गंभीर घटक असेल, सहाय्य एकटेच व सहाय्यभूत होणारे मूलतत्त्व असेल. तदनुसार एसजीएसवाय प्रकल्पांचे नियोजन व सिद्धता, कार्य समूहांची ओळख, संसाधन नियोजन व तसेच एसजींच्या कार्याची क्षमता निर्माण निवड, व्यक्तिगत स्वरोजगारीची निवड, कर्ज वसूली समाविष्ट पूर्व-उधार कामकाज व उत्तर-उधार संनियंत्रणामध्ये बँकांची एक मोठी गोवणूक दृष्टीसमोर ठेवते. एसजीएसवाय एक पूर्वीचे उधार “इंजेक्शन” पेक्षा अधिक श्रेयस्कर बहुविध उधार प्रवर्तन करण्याकरिता प्रयत्न करते. स्वरोजगारीची उधार आवश्यकता काळजीपूर्वक निर्धारित करण्यात येईल व त्यांना स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, जी रु. 7,500/- (अजा/अज करिता ती क्रमश: 50% व रु. 10,000/- राहील) च्या एका कमाल मर्यादेच्या अधीन प्रकल्प खर्चाच्या 30% वर एकरूप होईल, अंतर्गत येणा-या वर्षांमध्ये त्यांचे उधार अंतर्ग्रहण वाढविण्याकरिता उत्तेजन देण्यात येईल. एसएचजी करिता, सहाय्य रु. 1.25 लाखाच्या एका कमाल मर्यादेच्या अधीन प्रकल्प खर्चाच्या 50% राहील. सिंचन प्रकल्पांकरिता सहाय्यावर मर्यादा राहणार नाही.
कार्य समूह :
एसजीएसवाय कार्य समूहांवर जोर देते. साधनसंपत्ति, लोकांचे व्यावसायिक कौशल्य व बाजारांची उपलब्धता यावर आधारित प्रत्येक गटाकरिता 4-5 मुख्य कामे अभिज्ञात करण्यात येतील. मुख्य कामांची निवड गट स्तरावर पंचायत समित्या व जिल्हा स्तरावर जिल्हा ग्रामीण विकास एजंसी (डीआरडीए)/जिल्हा परिषद (झेडपी) यांच्या मान्यते सोबत राहील. कामे योग्य सुविधांच्या सहाय्यभूत विस्ताराकरिता योग्य समूहांमध्ये घेण्यात येतील. मुख्य कामे समाविष्ट करण्यामध्ये शक्य रूपात अधिक पंचायतींना अंतर्भूत करण्याची काळजी घेण्यात येईल. एसजीएसवाय सहाय्याचा मोठा हिस्सा कार्य समूहांमध्ये राहील. एसजीएसवाय प्रत्येक मुख्य कामाकरिता एक प्रकल्प दृष्टिकोन स्वीकृत करेल. कामांच्या समूहाकरिता वर्तमान संसाधनांचा आढावा घेण्यात येईल व गंभीर पोकळी एसजीएसवाय अंतर्गत भरण्यात येईल.
समूह दृष्टिकोन :
एसजीएसवाय समूह दृष्टिकोनावर ध्यान केंद्रित करते. ह्यामध्ये स्वयं-सहायता समूहांमध्ये गरिबांची संघटना व त्यांचे क्षमता निर्माण अंतर्भूत राहील. प्रत्येक एसएचजी समूह कामामध्ये महिला सदस्यांचा समावेश करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल व त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि निधीचा मोठा हिस्सा स्वयं सहायता समूहांना अधिकाधिक देण्यात येईल. प्रत्येक पंचायत समितिमध्ये कमीत कमी अर्धे समूह केवळ महिला समूह असावेत.
प्रशिक्षण :
विशेष जोर निवडक कामांकरिता व प्रत्येक स्वरोजगाराच्या आवश्यकतेकरिता विशेष अनुरूप चांगल्या प्रकारे बनविलेल्या प्रशिक्षण पाठ्यक्रमा द्वारे लाभाधिका-यांच्या कौशल्य विकासावर निर्धारित राहील.
पणन :
तंत्रशास्त्र व स्वरोजगारीच्या पणन गरजांकरिता सूक्ष्म लक्ष एसजीएसवायचे प्रमाणचिन्ह राहील. तंत्रशास्त्र हस्तक्षेप स्थानिक व बिगर-स्थानिक बाजाराकरिता नैसर्गिक व इतर साधनसंपत्ति पासून स्थानिक उपलब्ध सामानाची प्रक्रिया समाविष्ट स्थानिक साधनसंपत्तिमध्ये मूल्य जोडण्याकरिता शोधण्यात येईल. एसजीएसवाय, एसजीएसवाय स्वरोजगारी द्वारे उत्पादित सामानांचे पणन व प्रवर्तन करिता तरतूद करेल. यामध्ये निर्यात समाविष्ट करुन सामानांच्या पणनाकरिता संस्थाविषयक व्यवस्था, बाजार माहिती, बाजारांचा विकास आणि तसेच संमंत्रणा सेवेची तरतूद समाविष्ट राहील.
एसजीएसवाय – सफलतेकरिता काळजीपूर्वक योजनाबद्ध :
एसजीएसवाय प्रत्येक भाग घेणा-याची भूमिका – पंचायत, ग्राम सभा, बँक, वित्तीय संस्था, पीआरआय, एनजीओ आणि तसेच जिल्ह्यामधील तांत्रिक संस्थांना विचारात घेते. कल्पनात्मकता स्थितिच्या अगोदर पासून समावेशाकरिता काळजी घेण्यात येते, म्हणूनच ते कार्यक्रमाच्या सफलतेकरिता एक चमूच्या रूपात काम करतात. दारिद्र्य निर्मूलन प्रयत्न सुकर करण्याच्या हेतूसाठी विविध विभाग, आद्य प्रकल्प इत्यादी द्वारे समन्वित कार्याची गरज आहे. एसजीएसवायने विशेष प्रकल्पांकरिता एक तरतूद केली आहे, जी ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे मंजूर करण्यात येईल.
निधी वाटप :
एसजीएसवाय एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे व निधी 75:25 च्या गुणोत्तरामध्ये केंद्र व राज्य सरकारांद्वारे प्रदान करण्यात येईल.

Leave a comment

किसान क्रेडिट कार्ड योजना


१.                    शेतीसाठी खेळते भांडवल पुरवणारी बँकेची योजना
२.                   सर्व प्रकारच्या पीक लागवडी / जोपासनेची तरतूद उदा. भाजीपाला, फुले, नगदी पिके, भुसार पिके, गळीत पिके, तृणधान्ये, फळबागा इत्यादी.
३.                   नगदी स्वरुपात कर्ज वाटप. रु. ५०,०००/- हजारापर्यंत गपाण खर्च नाही.
४.                   १० ते २० %  आकस्तिक खर्चाची तरतूद.
५.                   शेतकन्याला पतपुस्तिका व चेक बुक दिले जाते.
६.                   कँश क्रेडिट मर्यादा ठरवून शेतकन्याला दिलेल्या मर्यादित खात्यांत व्यवहार करता येतो.
७.                   वैयक्तिक अपघात विमा योजनेसाठी पात्र. पिकविमा उपलब्ध.
८.                   कागदपत्रांचे अवडंबर नाही. जमिनीवर नाममात्र रकमेचा बोजा चढविला जातो.
९.                   दरवर्षी खात्याचा आढावा घेण्याची सुविधा उपलब्ध. गरजेप्रमाणे पत मर्यादा वाढविली जाते.
१०.                 सरल व्याज.


किसान समाधान क्रेडीट कार्ड योजना



१.        शेती कर्जाची कमीत कमी २ वर्षे नियमितपणे परतफेड करणारे सर्व पात्र सधन शेतकरी.
२.       कर्ज मर्यादा सध्याच्या एकूण वार्षिक उत्पत्राच्या ५ पट किंवा तारणसाठी घावयाच्या जमिनीच्या किंमतीच्या ५० %  दोन्हीपैकी कमी असणारी रक्कम.
३.       एकूण कर्ज रकमेच्या १० % जास्तीत जास्त रु ५०, ०००/- आकस्तिक खर्चाची वाढीव तरतूद
१.        कर्ज रकमेत रकमेत शोतीसाठी कमी मुदतीचे खेळते भांडवल व मध्यम / दिर्घ मुदतीच्या विकास कर्ज रकमांचा समावेश.
२.       पात्र शेतकच्यांना समाधान कार्ड, पतपुस्तीका व चेकबुक पुरविले जाते.
३.       खालील विमा योजनांचे संरक्षण
अ. वैयक्तिक अपघात विमा योजना
ब. राष्ट्रीय कृषी विमा योजना (एच्छिक)
४.       तारणपोटी जमीनीवर बँकेच्या कर्जाचा इकराराने बोजा चढविला जातो,


कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत विशेष सवलती


१.        नवीन किंवा जूना ट्रँक्टर खरेदीसाठी २५ अशवशक्ती पर्यंतचाया ट्रँक्टरसाठी फक्त ८ अकर बारमाही बागायत जमीन आवश्यक.
२.       पॉवर टिलरसाठी फक्त ३ त ५ एकर बारमाही बागायत जमीन आवश्यक.
३.       ट्रँक्टर व पॉवर टिलरसाठीच्या रु. ५०,०००/-पर्य़ंतच्या कर्जिस मार्जिन रकमेची आवश्यकता नाही. रु.५०,०००/- पुढील कर्जास फक्त १५ ते २० % मार्जिन रक्कम.
४.       शासनाकडून अनुदान मिळाळ्यास वेगळया मार्जिन रकमेची आवश्यकता नाही.
५.       तारणसाठी जमिनीचे गहाणखत करणे आवश्यक.
६.       बँकेच्या काही ट्रँक्टर व पॉवर टिलर कंपन्यांशी सामंजस्त करार. त्यानुसार शेतकच्यांना विशेष कँश डिस्काउंट व काही विना शुल्क सव्हिसेस उपलब्ध.
७.       परतफेड – नविन ट्रँक्टर … १ वर्षात, पॉवर टिलर … ७ वर्ष


शेतकच्यासाठी शेत जमीव खरेदी योजना


१.        नाबार्डच्या व्याख्येप्रमाणे लहान, अति लहान बटाईने किंवा कुळाने शोती करणारे शोतकरी ह्ग योजनाचा फाचदी घेऊ शकतात.
२.       जमीन खरेदी व विकास खर्चसाठी जास्तीत जास्त रुपये १० लाख कर्ज उपलब्ध.
३.       रु. ५०,०००/- पर्यंतच्या कर्जास मर्जिन आवश्यक नाही. त्यापुढील कर्जास कमीत कमी १० %
४.       तारण म्हणून विकत घेतलेल्या जमीनीचे गहाणखत.
५.       परतफेडीचा कालावधी ७ ते १२ वर्षे.
६.       व्याजदर बँकेच्या प्रचलित दरानुसार
७.       खरेदी करावयाची जमीन त्याच गावातील किंवा मालकीच्या जमीनीपासून ३ ते ५ कि.मी. च्या आत असावी.
८.       जमीन खरेदी बरोबर विकास कर्ज उपलब्ध.


कृषी पदवी धारकांसाठी अँग्री क्लिनिक व अँग्रो बिझेनेस सेंटर काढण्यासाठी योजना



१)        कृषी किंवा कृषी संलग्न विषयातील पदवी धारक उघोजक वैयक्तिक कींवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र.
२)       ह्ग योजनेअंतर्गत कृषी पदवी धारकाने तंत्रक्षान प्रसाराने पिकांचे रोग व किड नियंत्रण आदी बाबत शेतकन्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
३)       या योजने अंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी १० लाखाची / मर्यादा संयुक्तपणे घेतलेल्या प्रकल्पास रु. ५० लाखाची / मर्यादा.
४)       रु. ५ लाख पर्यँतच्या कर्जस मार्जनची आवश्यकता नाही. यापुढील कर्जाल अ. जा/ महिला लाभार्थीसाठी नाबार्डच्या मार्जीन मनी असिस्टोन्स योजनेखाली ५० % मार्जीन मनी उपलब्ध आहे.
५)       लाभार्य़ीस कर्जाशी निगडीत  २५ %  अनुदान उपलब्ध आहे. अजा / अजा महिला लाभार्थ्यास ३३ %  अनुदान उपलब्ध आहे. सदर रक्कम ३ वर्षे पुर्ण झाल्यावर मिळते.
६)       पहिली दोन वर्षे कर्जावरील पूर्ण व्याज रकमेचे अनुदान मिळते.
७)       वरील दोन्हीही प्रकारचे अनुदान बँक कर्जचे नियमितपणे परतफेड करणन्यासच मिळते. परतेफेडीचा कालावधी प्रकळ्पानुसार ५ ते १० वर्षे.
८)       उपरोक्त योजने अंतर्गत निवड झाल्यावर मान्याप्राप्त प्रशिक्षण संस्थेत विना शुल्क प्रशिक्षाणाची सोय.


शोतकरी मंडळ योजना


अ) शेतकरी मंडळ हे गांवचे खुले व अनौपचारिक व्यासपीठ
१.        योजनेचे उद्दिष्ट- कर्जच्या माध्यमातून शेतकच्यांचा विकास. कृषी तंत्रक्षान प्रसारण क्षमता बोंधणी इत्यादी.
२.       मंडळातील सदस्यांची संख्या कमीत कमी १० व जास्तीत जास्त कितीही.
३.       मंडळाचे बिगर थकबाकीदार, सर्व शेतकरी सदस्य होऊ शकतात.
४.       प्रत्येक मंडळात मुख्या स्वयंसेवक व सहायक स्वयंसेवक असे दोन पदाधिकारी असतात.
५.       एक गांव एक शेतकरी मंडळ. नजीकच्या २-३ गावांना मिळून देखील एक शेतकरी मंडळ काढता येते.
६.       मंडळाला नोंदणीची आवश्यकता नाही.
७.       मंडळाचे बँकेच्या नजीकच्या शाखेत बचत खाते उघडणे आवश्यक आहे.
८.       मंडळामार्फत कृषी तंत्रझान प्रसारणसाठी विविध कार्यक्रम उदा, शौक्षाणिक, भेटी, तक्षांचे व्याख्यान प्रगतीशील शेतकच्यांच्या शेकांने भेटी इत्यादी.
९.       नाबार्ड मार्फत पहिले तीन वर्ष काही आर्थिक सवलती उपलब्ध.
१०.     मंडळाच्या सदस्याना कृषी कर्ज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य.
११.     शेतकरी मंडळे बचत गटांची निर्मिती करु शकतात. बँकेला वसुलीसाठी व नव-नवीन योजना राबविण्यासाठी मदत करु शकतात.
१२.     बँकर व कर्जदार दोघांनाही फायहेशीर.


व्हेचर कँपिटल फॉर डे अरी व पोलट्री योजना


१.        पात्र शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेऊ शकतात.
२.       पात्र व्यवसाय व प्रकल्प किंमत-
अ) लहान डेअरी – ( १० म्हशी किंवा संकरीत गायी) दुधाचा महापूर योजना ज्या तालुक्यात राबविली आहे त्या तालुक्यांना ही योजना लागु नाही. प्रकल्प किंमत – रु. ३ लाख.
ब) मिल्कींग मशिन व बळ्क मिल्क कुलींग युनिट (२००० लि. क्षमतेपर्यंत) प्रकल्प किंमत – रु १५ लाख.
क) स्थानिक दुग्धजन्य पदार्थ तयार करणयासाठी मशिनरी विकत घेणे.
प्रकल्प किंमत – रु १० लाख.
ड) दुग्ध पदार्थ वाहतुक व्यवस्था (कोल्ड चेन सहीत
प्रकल्प किंमत – रु २० लाख.
इ) खाजगी व्हेटरनरी क्लिनिक काढण्यासाठी रु. २ लाख. फिरते क्लिनिक व स्थानिकासाठी रु. १.५० लाख
उ) पोल्ट्री ब्रीडींग फार्म
प्रकल्प किंमत – रु ३० लाख.
३.       मार्जिन श्क्कम १० %
४.       प्रकल्प किंमतीच्या ५० %  बीनव्याजी वहेंचर कँपिटल
५.       बँक कर्ज – प्रकल्प किंमतीच्या ४० %
६.       परतफेड कालावधी ७ वर्षे
७.       योजनेची अंमलबजावणी नाबार्ड बँकांमार्फत करते.
८.       नियमित कर्जफेड करणान्यांस बँकेने दिलेल्या कर्जवर ५० %  व्याजासाठी अनुदान मिळते.

कृषी कर्जाच्या इतर योजना


१)        राष्ट्रीय फलोघान मंडळामार्फत फलोत्पादन विकास अंतर्गत राबनिल्या जाणाच्या विविध योजना.
२)       केंद्र शासन पुरस्कृत अ.जा.व.अ.ज.च्या शेतकन्यांसाठी सिंचनासाठी शेततळी बांधण्यामाठी योजना.
३)       राष्ट्रीय प्रकल्प – सेद्रीय शेती अंतर्गत विविध उपक्रम.
४)       ठिंबक सिंचन योजना.
५)       हरितगृह योजना
६)       कृषी निर्यात क्षोन अंतर्गत विविध फळे, फुले व भाजीपाला पिकांना कर्ज
७)       करार पध्दतीने शेती प्रकल्पांना कर्ज
८)       बचत गटंना कृषी उत्पादन व कृषी विकास कर्ज.
९)       कुळाने/ बटाईत शेती करणन्या शेतकन्यांच्या संयुक्त देणदार गटांना कर्ज (Joint liability Groups (JLG’s)
१०)     ग्रामीण भागात पेट्रो प्राँडक्टस विकण्यासाठी काढलेल्या किसान सेवा केंद्राना कर्ज
११)     शेतकन्यांना घरगुती गँस शेगडी खरेदीसाठी कर्ज सोय.
१२)     शेतकनायांना दुचाकी वाहन खरेदीसाठी कर्ज
१३)     ग्रामीण भागात स्वच्छतागृह बंधणेसाठी कर्ज

Leave a comment