सेंद्रीय शेती

सेंद्रीय शेती सद्या सुमारे ११० देशामध्ये केली जात असून शेत जमिनीतील तीचा हिस्सा वाढतो आहे.
सेंद्रीय अन्नाच्या बाजारपेठा – युनायटेड स्टेटस, द. युरोपियन युनियन (जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, युनायटेड किंगडम) आणि जपान या सेंद्रीय अन्नाच्या उत्पादनासाठी मुख्य बाजारपेठा आहेत.सेंद्रीय उत्पादनाची निर्मिती करणारे आशियातील प्रमुख देश आहेत, चीन, युक्रेन, भारत, इंडोनेशिया आणि इस्त्राईल.
सेंद्रीय बाजारपेठ स्थिर गतीने वाढत असताना त्यासंबधी सेंद्रीय प्रमाणीकरण (सर्टीफिकेशन) आणि नियमावली अधिकाधिक कठोर आणि अनिवार्य होत आहे. सेंद्रीय प्रमाणीकरण हि सेंद्रीय अन्नाच्या आणि इतर सेंद्रीय कृषि उत्पादनाच्या उत्पादकासाठी एक प्रमाणीकरण प्रक्रिया आहे. सर्वसाधारणप्रमाणे, सेंद्रीय अन्नाच्या उत्पादनाशी थेट संबध असलेल्या कोणत्याही व्यवसायाला, उदाहरनार्थ, बियाण्याचे पुरवठादार, शेतकरी, अन्न प्रक्रियादार, रिटेलर्स आणि रेस्टोरन्टन्सला प्रमाणपत्र मिळू शकते. प्रत्येक देशानुसार त्यासाठी असलेल्या आवश्यतेनुसार मध्ये बदल होतो आणि सर्वसाधारणतः त्यामध्ये पिकविणे, साठविणे, प्रक्रिया करणे, पॅकेजिंग करणे आणि वाहतुक करणे इत्यादी बाबतच्या उत्पादन मानकांचा समावेश असतो.त्याचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.
कृत्रिम रासायनिक निविष्ठा (उदा ऱासायनिक खते, किटकनाशक, प्रती जैविके, अन्नपुरके वगैरे) आणि जनुकीय दृष्टया बदल केलेले सजिव टाळणे.
 • जी जमीन रसायनापासून अनेक वर्षे (बहुधा तीन) मुक्त आहेत अशा जमिनीचा वापर
 • उत्पादनाच्या आणि विक्रीच्या तपशिलवार नोंदी ठेवणे. (लेखा परिक्षा नोंदी)
 • सेंद्रीय उत्पादने  अप्रमाणीत उत्पादनापासून काटेकोरपणे वेगळी ठेवणे.
 • ठराविक कालावधीने उत्पादनाच्या जागेवरच तपासणी करवून घेणे.
प्रमाणीकरणाचा हेतु
जगभरात सेंद्रीय अन्नालाअसलेल्या वाढत्या मागणीमुळे प्रमाणपत्री करणाची आवश्यकता भासत असून सेंद्रीय व्यापारातील गुणवत्ता आश्र्वासित करण्यासाठी आणि फसवणूक आळणे व त्यामागील हेतु आहे. ग्राहकांसाठी प्रमाणीत सेंद्रीय हा शिक्का उत्पादनाच्या दर्जाची खात्री देतो. प्रमाणपत्रीकरण हे वस्तुतः एक विपणन साधन असून त्याचा उद्देश  सेंद्रीय उत्पादनाची विक्री ग्राहकांना करणे सुलभ आणि नियमीत व्हावे असा आहे.
प्रमाणपत्रीकरण प्रक्रिया
एखादे शेत प्रमाणीत करुन घेण्यासाठी शेतक-यांला शेतीच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक कामे करावी लागतात.
सेंद्रीय मानकांचा अभ्यास  करावा लागतो. ज्यामध्ये शेत मालाचे साठवण, वाहतुक आणि विक्री अशा शेतीच्या प्रत्येक बाबतीत आवश्यकतांच्या तपशिलाने समावेश असतो.
 • अनुपालन- शेतावरील सुविधा आणि उत्पादनाच्या पध्दतीनी मानकांचे अनुपालन करणे आवश्यक असते. ज्यामध्ये सुविधामध्ये बदल करणे, स्त्रोतामध्ये आणि पुरवठादारामध्ये बदल करणे वगैरे आवश्यक ठरु शकतो.
 • लेख प्रविष्ठ करणे – व्यापक कागदोपत्री व्यवहार करावा लागतो. शेताच्या इतिहासाचा तपशिल, सद्याचा तपशिल आणि बहुदा मातीच्या व पाण्याच्या चाचण्याचे निष्कर्ष नोंदवावे लागतात.
 • नियोजन- एक लेखी वार्षिक उत्पादन योजना सादर करावी लागते. त्यामध्ये बियाण्यापासून विक्रीपर्यत सर्व तपशिल द्यावा लागतो. बियाण्याचे स्त्रोत, शेताचे आणि पिकाचे स्थान, खते, आणि किटकनाशक, कापणीच्या पध्दती, साठवणाचे स्थान वगैरे.
 • तपासणी – शेतातील वार्षिक तपासण्या प्रमाणपत्र देण्या-याकडून केल्या जातात. त्यामध्ये प्रत्यक्ष दौरा, नोंदीची तपासणी आणि तोंडी मुलाखत यांचा समावेश असतो.
 • शुल्क – वार्षिक तपासणीसाठी /प्रमाणपत्रासाठी शुल्क अकारण्यात येते ते वेगवेगळया देशामध्ये वेगवेगळे असतो.
 • नोंदी ठेवणे- कोणत्याही वेळी सर्व कामाची नोंद करणा-या लेखी, दैनदिन कृषि आणि विपणन नोंदी तपासणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त थोडीशी पुर्वसुचना देवून किंवा न देताही तपासण्या केल्या जातात  आणि ठराविक चाचण्या  (उदा ज़मिनीच्या पाण्याच्या किंवा रोपाच्या उतीच्या ) घेतल्या जातात. पाहिल्यांदा शेताला प्रमाणपत्र देताना जमिन निविष्ठा पदार्थापासून (कृत्रिम रसायने) काही ठराविक वर्षे मुक्त असणे ही प्राथमिक गरज असते. बहुदा तीन वर्षाच्या या कालावधीसाठी, पारंपारिक शेताने सेंद्रिय मानकांचे पालन करणे अत्यावश्यक असते य़ाला संक्रमण काल असे म्हणतात. संक्रमण कालातील पिकांना पुर्णतः सेंद्रीय समजले  जात नाही. ज्या शेतात अगोदरपासूनच कॅमिकलशिवाय पिके घेतली जातात त्याला सामान्यतः विनाविलंब प्रमाणपत्र मिळते.
शेता व्यतिरिक्त इतर परिचालनासाठीही प्रमाण पत्र अशाच रितीने देण्यात येते. तेथे घटक द्रव्यावर आणि इतर निविष्ठावर तसेच प्रक्रियेच्या हाताळणीच्या स्थितीवर भर दिला जातो.
जागतिक प्रमाणीकरण संस्था
बहुतेक देशामध्ये सेंद्रिय मानके शासनामार्फत तयार करण्यात येतात  आणि शासनाची त्यांच्यावर देखरेखही असते. युनायटेड स्टेटस,युरोपियन युनियन आणि जपान या तीन प्रमुख सेंद्रीय बाजारपेठामध्ये सेंद्रीय कायदे समावेशक स्वरुपाचे आहेत आणि सेंद्रिय ही संज्ञा वापरण्याची मुभा फक्त प्रमैंणीत उत्पादकांनाच आहे. सेंद्रीय कायदे नसलेल्या देशामध्ये शासकीय मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात असतात ड्ढिंवा नसतातही आणि प्रमाणपत्रीकरणाचे काम गैर व्यापारी संस्था किंवा खाजगी कंपन्या करतात.
प्रमुख देशातील प्रमाणीकरण यंत्रणा
. क्र. देश प्रमाणीकरण यंत्रणा / संस्था
युरोपियन युनियन इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रीकल्चर मुव्हमेटस (FOAM)
युनायटेड किंगडम युके रजिस्ट्रर ऑफ ऑरगॅनिक फुड स्टॅर्डस (UKROFS)
युएसए नॅशनल ऑरगॅनिक प्रोग्रॅम  (NOP)
जपान जपानीज ऍग्रीकल्चर स्टॅडर्ड  (JAS)
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया क्वारंटाईन ऍन्ड इन्स्पेक्शन र्सव्हिस (AOIS)
भारत नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन (NPOP)
भारतामध्ये शासनाने खालील सहा संस्था प्रमाणपत्रीकरण संस्था म्हणून अधिस्विकृत करण्यासाठी नेमस्त केलेल्या आहेत.
१.                  अपेडा
२.                 टी बोर्ड
३.                 स्पायसेस बोर्ड
४.                 कॉफी बोर्ड
५.                कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड
६.                  डायरेक्टोरेट ऑफ कॅश्यु आणि कोको
सेंद्रीय शेतीमालाला असलेली निर्यात बाजारपेठ ही भारतातील सेंद्रीय शेतीची मुख्य प्रेरणा आहे. भारतातुन ३१ सेंद्रीय उत्पादने निर्यात होतात. भारत सेंद्रीय चहाचा निर्यातदार म्हणून प्रसिध्द आहे. सेंद्रीय भात, भाज्या, कॉफी तेलबिया, गहु आणि कडधान्ये यांनाही चांगला प्रतिसाद आहे. फळाच्या पिकांपैकी केळी, आंबा आणि संत्री ही सर्वाधिक पसंतीची सेंद्रीय उत्पादने आहेत.
भारतातील सेंद्रीय उतपादनांची टक्केवारी
चहा २४ टक्के
भात २४ टक्के
फळे व भाजीपाला १७ टक्के
गहु १० टक्के
कापुस ८ टकके
मसाले ५ टक्के
कॉफी ४ टक्के
कडधान्य ३ टक्के
काजू ३ टक्के
इतर २ टक्के
सेंद्रीय माल आयात करणारे प्रमुख देश
जर्मनी फळे व भाज्या, चहा कॉफी मसाले
युके –    फळे व भाज्या
नेदरलँड      –    ताजी फळे व भाज्या, धान्य, तृणधान्य चहा व वनोऔषधी
भारतामध्ये सेंद्रीय माल प्रमाणपत्रीकरण करण्यासाठी NPOP अंतर्गत ११ संस्थाना अधिस्विकृत प्रमाणीकरणाचे काम करतात त्यामध्ये महाराष्ट्रातील संस्थाचा समावेश आहे.
1.                 BVQI (INDIA) PVT. LTD. MUMBAI
2.                 ECOCERT SA (INDIA BRANCH ) AURANGABAD
3.                 INTERNATIONAL RESOURCES FOR FALRER TRADE MUMBAI
4.                 NATIONAL ORGANIC CETIFICATION ASSOCIATION (NOCA) PUNE
भारतातुन ६४ निर्यातदारांमार्फत सेंद्रीय माल निर्यात केला जातो.त्यामध्ये ७ निर्यातदार महाराष्ट्रातील आहेत.
1                   Amit  green Auro P.Vt. Ltd.  MUMBAI
2                   Bheda Brothers Mumbai
3                   H Beda & Co. Mumbai
4                   Indway International Mumbai
5                   Mahesh Agri exim Pvt. Ltd. Mumbai
6                   Vidarbha organic farmers Association Yevatmal
7                   Weikfield Product Co. Pune
सेंद्रीय प्रमाणपत्रीकरणाबाबतची सविस्तर माहिती अपेडाच्या (www.apeda.com) वर उपलब्ध आहे.
सेंद्रीय कषि माल उत्पादन करण्याकरीता शेतक-यांनी अपेडाकडे अधिकृत संस्थेमार्फत प्रमाणीकरण घेवूनच करणे आवश्यक आहे.
Advertisements
 1. Leave a comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: