सामूहिक ठिबक सिंचन करणार गांव

सांगली जिल्ह्यातलं गोटखिंडी असं या गावाचं नाव आहे. या गावात ६०८ एकरात सामूहिक ठिबक लावण्याचं काम सध्या सुरु आहे, ठिबकची ही प्रणाली संपूर्ण संगणकीकृत असणार आहे. महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पुढाकारानं हा प्रकल्प पूर्णत्वास आलाय. आपलं पाणी आणि माती वाचवण्यासाठी या संस्थेनं हा निर्णय घेतलाय.
thibak
thibak
सांगली जिल्ह्यातलं गोटखिंडी हे गाव. १९८७ च्या आधी या गावाची स्थिती फारसी चांगली नव्हती. शेतीला पुरेसं पाणी मिळत नव्हतं आणि शेतीही फारसी पिकत नव्हती. ४ फेब्रुवारी १९८७ साली या गोटखिंडी या गावात महादेव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची स्थापना झाली. आणि गावचं चित्र बदलायला लागलं. या संस्थेचे ३०८ सभासद आहेत आणि ६०८ एकर लाभक्षेत्र आहे. संस्थेनं लिफ्ट इरिगेशनद्वारे गावापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या कृष्णा नदीचं पाणी गावात आणलं. आता शेतीला पाणी मिळालं होतं. शेती पिकायला लागली होती… पण गेल्या चार-पाच वर्षांपासून वीज आणि पाण्याचा लपनडाव सुरु झाला. पाण्याचा फेर परत कधी येईल याची शास्वती नव्हती. त्यामुळे शेतकरी ऊसाला भरमसाठ पाणी देऊ लागले. यातून क्षारपड जमिनीची समस्य़ा निर्माण झाली. उत्पादन घटू लागलं. शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली. यातून मार्ग काढण्यासाठी संस्थेच्या सभासदांचे प्रयत्न सुरु झाले. बैठका झाल्या, चर्चा झाली. शेवटी ३ मे २०१० ला संपर्ण क्षेत्रावर संगणकीकृत ठिबक सिंचन प्रकल्प राबवण्याचा निर्णय झाला.

संगणकीकृत ठिंबक सिंचन प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा तयार झाला. आता चिंता होती पैशाची, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ही सभासदांची ही चिंताही मिटवली. बँकेकडून सभासदानां एकरी 30 हजार रूपये कर्ज मिळालं. 1 कोटी 80 लाख रूपये मंजूर झालं. या गोटखिंडी गावाचं 1600 हेक्टर क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्राला हक्काचा पाणी मिळण्याच्या कामाला वेग आला.

पाण्याच्या अनियमिततेमुळे ऊस, सोयाबीन, द्राक्ष, ज्वारी यासारख्या पिकांचं अर्थशास्त्र बिघडलं होतं. ठिबक सिंचनानं ही समस्या सुटेल यावर गावकऱ्यांचा विश्वास बसला. ठिबक सिंचन प्रकल्पातून सभासदांना आता पिकनीहाय पाणी मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचंही मार्गदर्शन मिळालं.

 संगणकीकृत ठिबक सिंचनासाठी 608 एकर क्षेत्राची चार भागात विभागणी केरण्यात आलीय.त्यातल्या वीस एकरला एक या प्रमाणं उपभाग तयार करण्यात आलेत. नदीवरून आणलेलं  पाणी 10 लाख लिटरच्या स्टोरेज टँकमध्ये साठवलं जाणार आहे. याच ठिकाणी संपूर्ण पाण्याची

कंन्ट्रोल रूमही राहणार आहे. याच रुममधून संगणकाद्वारे पाणी आणि खत सोडण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे. ही यंत्रणा उभारणीचं काम सध्या सूरू आहे.

याआधी पाटपाण्यानं दिवसाला 76 लाख लिटर पाण्यात 10 एकरचंही क्षेत्र भिजत नव्हतं. आता मात्र मोजून मापून पाणी मिळणार आहे. एकरी अडीच तासात साडेबारा हजार (१२,५००)लिटर पाणी दिलं जाणार आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात सात फूटाला एका लॅटरलचं नियोजन करण्यात आलंय.

याआधी गोटखिंडी गावात फारसं क्षेत्रं ठिबकखाली नव्हतं. पण आता शेतकऱ्यांना ठिबकचं महत्त्व कळलंय. संगणकीकृत ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्यांना पिकानुसार पाणी मिळणार आहे. शिवाय या शेतकऱ्यांना ऊसाव्यतिरीक्त इतर पिकांचेही पर्याय आता खुले झालेय.

महादेव पुरवठा संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना या सिस्टिमसाठी एकरी 58,366 रूपये खर्च येणार आहे. त्यात एकरी 15,000 रूपये अनुदान सोय आहे. संपूर्णत: संगणीकृत यंत्रणेमुळे मजुर, खत, पाणी आणि वेळेची बचत होणार आहे, शिवाय पिकांना पुरेसं पाणी मिळाल्यानं उत्पादनातही वाढ होणार हे नक्की. हे झालं गोटखिंडी या गावचं आणि महादेव पाणीपुरवठा संस्थेचं पाणी नियोजन. पण आजही अशी अनेक गावं आणि अनेक संस्था आजही अवाजवी पाण्याचा वापर करत आहे. या गावांना आणि संस्थांना आपली जमिनी वाचवण्यासाठी आतातरी ठिबक सिंचनाकडं वळाय़लाच हवं.

Advertisements
  1. Leave a comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: