केळी


  1. ठिबक सिंचनाखाली अधिक उत्पादनासाठी केळी लागवड नेहमीचा पध्दतीने 1.5 मिटर * 1.5 मिटर अंतरावर करुन प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी व प्रत्येक झाडासाठी 1 तोटी ठेवावी. रासायनिक खताची मात्रा ( 100..40..200) ग्रॅम नत्र – स्फुरद – पालाश प्रत्येक झाडास प्रचलीत खताद्वारे द्यावी. यापैकी एकुण नत्राचा 15 टक्के मात्रा लागवडीपासून 8 आठवडे 40 टक्के 9 ते 16 आठवडे, 35 टक्के 17 ते 24 आठवडे 20 टक्के 25 ते 32 आठवडे अशा 32 हप्त्यात आठवड्याचा अंतराने ठीबक वाटे द्यावी.
  2. केळीवरील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागणीपुर्वी केळीचे फनवे एकसंध तासून नंतर मोनोक्रोटोफॉस 36 एस.एल. 05 टक्के तीव्रतेचा द्रावणात 60 मिनीटे बुडवून लागवड करुन 45 दिवसांनी ( बियाणे 10 कि।हे ) किंवा ताग ( बियाणे 10 कि।हे ) हि आंतरपिके घेऊन ते लागवडीनंतर 90 दिवसांनी जमिनीत गाडावीत.
   3.        केळीचे मुनवे ४५० ते ७५० ग्रँम वजनाचे असावेत. मध्यम आकाराचे त्रिकोणाकृती कमीत कमी मुनवे फुटलेले कंद किंवा           मध्यम आकाराचे उभट नसलेले परंतू सरळ कंद ज्याला मध्यम प्रमाणामध्ये मुनवे फुटलेले आहेत असे कंद                      लागवडीसाठी निवडावेत.(म.फु.कृ.वि.राहुरी)
   4.         लागवडीच्या सर्वात चांगला हंगाम म्हणजे मृग बाग (जून लागवड). त्याचप्रमाणे ऑक्टोबर लागवड म्हणजेच कांदे बाग            हा सर्वात चांगला हंगाम आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
 5.          अशी शिफारस आहेकी केळीची बसराई ही जात १.२ मिटर X १.५ मिटर किंवा १ मिटर X १.२ मिटर X मिटर ह्या                अंतरावर ठिबक सिंचनाने लावल्यास जास्तीत जास्त उत्पादन प्रती हेक्टरी मिळून जास्तीत जास्त नफा मिळेल                    (म.फु.कृ.वि.राहुरी)
 6.        निरनिराळ्या लागवड पध्दतीमध्ये उदा. नेहमीच्या पध्दतीत १.५ X १.५ मिटर, चौरस पध्दत (०.९ मिटर X ०.९ मिटर) X       २.१ मिटर आणि आयताकृती पध्दतीत (१.५ मिटर X ०.९ मिटर) X २.१ मिटर ठिबक सिंचनाने नेहमीची व आयताकृती            पध्दत चौरसाकृती पध्दतीतपेक्षा चांगली आढळली, परंतू कमी पाण्याच्या उपलब्धतेत आयताकृती पध्दत चांगली                        आढळली. ठिबक सिंचनाची नळी आणी ड्रीपरची संख्या आयताकृती पध्दतीत नेहमीच्या पध्दतीपेक्षा ५० टक्क्याने कमी        लागली. (म.कृ.वि. परभणी)
7.              मराठवाडा विभागातील कमी पावसाच्या ठिकाणी तसेच भारी जमिनीत केळीची लागवड ठिबक सिंचनाखाली                           यशस्वीरीत्या १.५ मिटर X १.५ मिटर अंतरावर आणि एक उपनळी प्रत्येक ओळीला तसेच एक ड्रीपर एका झाडाला       लावता येतो जर पाणी कमी असेल तर जोडओळ पध्दतीत (०.९ X २.१ X १.५ मिटर) आणि उपनळी प्रत्येक  ओळीस     एक आणि प्रत्येक झाडास एक ड्रीपर लावावा. त्यानंतर दरदिवशी किंवा दिवसाआड पाणी द्यावे. (म.कृ.वि. परभणी)
6.                  निव्वळ नफ्याच्या विचार केल्यास नारळ-सुपारी-केळी किंवा आंबा-काजू मिश्र पिक पध्दतीत दक्षिण कोकणात जास्तीत जास्त नफा मिळतो. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)
8.      प्रती हेक्टरी ९०० किलो नत्र (२०० ग्रँम प्रती झाड) दुस-या चौथ्या आणि सहाव्या महीन्यात एक समान प्रमाणात + ३३५ किलो स्फुरद प्रती हेक्टरी (८० ग्रँम प्रती झाड सारख्या प्रमाणात लागवडीच्या वेळी तसेच त्यानंतर दोन महीन्यांनी + ८९० किलो पालाश प्रती हेक्टर (२०० ग्रँम प्रती झाड लागवडीच्या तसेच त्यानंतर सहा महीन्यांनी समान प्रमाणात विभागून केळीच्या बसराई जातीस I आणि II पर्जन विभागात देण्याची शिफारस केली आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
1.                  लागवडीच्या वेळी ५० ते ६० टन शेणखत प्रती हेक्टर केळीच्या चांगल्या वाढीसाठी देणे आवश्यक आहे. १०० ग्रँम नत्र प्रती झाड ३ सारख्या प्रमाणात विभागून म्हणजे लागवडीनंतर ६०, ९०, आणि १२० दिवसांनी तसेच १०० ग्रँम पालाश आणि ४० ग्रँम स्फुरद लागवडीच्या वेळी देणे गरजेचे आहे. स्फुरद व पालाशची पुर्ण मात्रा लागवडीच्या वेळी आणि नत्र तीन सारख्या प्रमाणात ८ ते १० सें.मी. खोलीच्या चर काढून देण्याची शिफारस केली आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
2.                  नत्र २०० ग्रँम, स्फुरद ४० ग्रँम, पालाश २०० ग्रँम प्रती झाड द्यावे. स्फुरद पालाशची पुर्ण मात्रा आणि नत्राची २५ टक्के मात्रा लागवडीनंतर एक महीन्याने आणि राहीलेले नत्र दुस-या तिस-या चौथ्या महिन्याने सारख्या प्रमाणात विभागून द्यावे. (पं.कृ.वि.अकोला)
3.                  केळीसाठी बसराई जातीत २०० किलो नत्र ८० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश प्रती हेक्टरी देणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते नत्र लागवडीनंतर २, , आणि ६ महिन्याने विभागून द्यावे. स्फुरद लागवडीनंतर दोन महीन्याने आणि पालाश लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर सहा महिन्यांनी समप्रमाणात विभागून द्यावेत. (म.फु.कृ.वि.राहुरी)
4.                  केळीचे जास्तीत उत्पादन मिळवण्यासाठी ग्रँड-९ जातीत २०० ग्रँम नत्र ४० ग्रँम स्फुरद आणि २०० ग्रँम पालाश प्रती झाड देण्याची शिफारस केली आहे. २०० ग्रँम नत्रापैकी २५ टक्के नत्र सेंद्रीय खतातून (१० किलो शेणखत लागवडीच्या वेळी) आणि ७५ टक्के रासायनिक खतातून ४५, ९०, १३५, आणि २१० दिवसांनी समप्रमाणात विभागून द्यावेत. स्फुरद ४० ग्रम प्रती झाड लागवडीच्या वेळी द्यावे आणि २०० ग्रँम पालाश ४ सारख्या प्रमाणात विभागून १६५, २५५, आणि ३०० दिवसांनी द्यावीत. (म.फु.कृ.वि.राहुरी)
5.                  केळीमध्ये ठिबक सिंचनाखाली जास्त उत्पादन मिळण्यासाठी लागवड १.५ मिटर X १.५ मिटर आणि प्रत्येक ओळीस एक उपनळी आणि एक ड्रीपर प्रतीझाड लावावा. प्रती झाड १००:४०:२०० ग्रँम नत्र, स्फुरद पालाश द्यावा. नत्राची मात्रा ठिबक सिंचनामार्फत ३२ आठवड्यानी द्यावी. १५ टक्के नत्र लागवडीनंतर ८ आठवड्यांनी ४० टक्के नत्र ९ ते १६ आठवड्याच्या कालावधीत २० टक्के नत्र १६ ते २४ आठवड्याच्या कालावधीत आणि २५ टक्के नत्र २५ ते ३२ आठवड्याचा कालावधीत देणे आवश्यक आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
6.                  केळीच्या अधीक उत्पादनासाठी बसराई जातीत मैदानी प्रदेशात प्रत्येक झाडास २०० ग्रँम नत्र दुस-या चौथ्या आणि सहाव्या आठवड्यानी लागवडीनंतर, ८० ग्रम स्फुरद लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर दोन महीन्यानी तसेच २०० ग्रँम पालाश दोन सारख्या प्रमाणात लागवडीच्या वेळी तसेच सहा महिन्यांनी द्यावी.
7.                  केळी पिकास ठिबक सिंचनामार्फत पाणी दिल्यास मोकाट सिंचनापेक्षा भरपूर उत्पादन मिळते.( म.कृ.वि.परभणी)
8.                  सिचनाची खोली १.० इ.टी.सी. ठिबक सिंचनामार्फत दिल्यास ०.६ आणि ०.८ इ.टी.सी. पेक्षा चांगले परीणाम मिळतात. एकूण पाण्याची गरज पुर्ण पिक वाढीच्या काळात ठिबक सिंचनामार्फत १९०० मि.मी. असून मोकाट सिंचनात २५४३ मी.मी. आहे. (पर्जन्यमान वगळता) त्यामुळे ठिबक सिचन पध्दतीत २६ टक्के पाण्याची बचत होते. (म.कृ.वि.परभणी)
9.                  ठिबक सिंचन पध्दतीत पाण्याचे वेळापत्रक बाष्पीभवनाच्या प्रमाणात वेगवेगळ्या पिक वाढीच्या अवस्थेनुसार ठरवावे. उन्हाळी हंगामात दररोज किंवा दिवसाआड पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. (म.कृ.वि.परभणी)
10.              गव्हाचे काड आणि केळिचे खुंट आच्छादनासाठी वापरल्यास (१२.५ किलो प्रती झाड) घडाचे वजन वाढते आणि पाण्याची बचत होते. आच्छादनाचा वापर उन्हाळी हंगामाचा सुरूवातीली सूरू करावा (फेब्रुवारी). केओलीन ८ टक्के फवारणी फेब्रुवारीनंतर पाऊस सूरू होईपर्यत १५ दिवसांच्या अंतराने केळीच्या पानांवर करावी. त्यामुळे सुध्दा वरीलप्रमाणेच परीणाम मिळतात (म.फु.कृ.वि.राहुरी)
11.              भारी जमिनीत केळी पिकास ठीबक सिंचनाद्वारे दुस-या आणि चौथ्या दिवशी बाष्पीभवन पात्राचा ६० टक्के पाणी द्यावे. (म.कृ.वि. परभणी)
12.              केळीची बसराई जातीत १.५ मिटर X १.३५ मिटर अंतरावर लागवड केल्यास आणि ठिबक सिंचनामार्फत पाणी दिल्यास दिवसाआड ६० टक्के झिजवल्यास जास्तीत जास्त उत्पादन मिळते. (म.फु.कृ.वि.राहुरी)
13.              प्रभावीरीत्या तण नियंत्रणासाठी केळी पिकांत एकात्मिक तण नियंत्रण पध्दत (जमिनीचा चाळणी + खुरपणी + चवळीचे पिक दोनदा घेऊन गाडणे) ही शिफारस करण्यात आली आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
14.              जास्त उत्पादनासाठी आणि फायद्यासाठी केळीचे पिक तणमुक्त ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)
15.              केळीमध्ये (बसराई) भुईमुगाचे आंतरपिक (फुले प्रगती) खरीप हंगामात घेतल्यास भुईमुगाचे बोनस उत्पादन केळीवर कोणताही विपरीत परीणाम न होता मिळते. (म.फु.कृ.वि.राहुरी)
16.              केळीच्या घडातील सातवी किंवा आठवी फण्या नंतरच्या येणा-या फण्या काढल्यास फण्याचे वजन वाढते आणि निर्यात योग्य उत्पादन बसराई जातीत मिळते. (म.फु.कृ.वि.राहुरी)
17.              पोटँशियम डायहायड्रोजन फॉस्फेटची फवारणी ०.५ टक्के + युरीया १ टक्का फुलोरा आल्यानंतर १५ दिवसांनी फवारल्यास उत्पादन वाढून काढणी लवकर होते. त्याचप्रमाणे २,४-डी १० पी.पी.एम. फवारल्यास चांगले परीणाम मिळतात. (म.फु.कृ.वि.राहुरी)
18.              कळीचे घड छिद्र असलेल्या पांढ-या पॉलिथीन पिशवीने झाकल्यास (खाली बाजून उघडे असलेल्या) तसेच निंबोळी पेंड १ किलो प्रती झाड दिल्यास उत्पादन वाढून काढणी लवकर होते. (म.फु.कृ.वि.राहुरी)
27.              ठिबक सिंचनाखाली अधिक उत्पादनासाठी केळी लागवड नेहमीचा पध्दतीने 1.5 मिटर * 1.5 मिटर अंतरावर करुन प्रत्येक ओळीसाठी एक उपनळी व प्रत्येक झाडासाठी 1 तोटी ठेवावी. रासायनिक खताची मात्रा ( 100..40..200) ग्रॅम नत्र – स्फुरद – पालाश प्रत्येक झाडास प्रचलीत खताद्वारे द्यावी. यापैकी एकुण नत्राचा 15 टक्के मात्रा लागवडीपासून 8 आठवडे 40 टक्के 9 ते 16 आठवडे, 35 टक्के 17 ते 24 आठवडे 20 टक्के 25 ते 32 आठवडे अशा 32 हप्त्यात आठवड्याचा अंतराने ठीबक वाटे द्यावी.
28.              केळीवरील सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागणीपुर्वी केळीचे फनवे एकसंध तासून नंतर मोनोक्रोटोफॉस 36 एस.एल. 05 टक्के तीव्रतेचा द्रावणात 60 मिनीटे बुडवून लागवड करुन 45 दिवसांनी (बियाणे 10 कि।हे) किंवा ताग (बियाणे 10 कि।हे) हि आंतरपिके घेऊन ते लागवडीनंतर 90 दिवसांनी जमिनीत गाडावीत.
29.                केळीच्या कोकण सफेद वेलची या वाणाची मुख्य पीक तसेच नारळ व सुपारी बागेत आंतरपीक म्हणून कोकणात लागवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे. . (बा.सा.को.कृ.वि.दापोली)
Advertisements
  1. Leave a comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: